कामगार दिनी सरपंचाचे मजुरांना आवाहन
नेरी : नुकतेच तेंदू पत्ता संकलनाच्या हंगामाला सुरवात होणार असून येत्या दोन तीन दिवसात तेंदू पत्ता तोडण्यासाठी त्यांचे संकलन करण्यासाठी गावोगावातील मजूर वर्ग वनात जाणार आहेत. तेव्हा वनात जाताना वन्य प्राण्यापासून सावधगिरी बाळगत काळजीपूर्वक जावे व सतर्कता बाळगावी असे आवाहन सरपंच दिक्षा पाटील लोहारा यांनी केले आहे.
. नुकतेच मोहफुल वेचण्याच्या हंगामाची सांगता झाली असून या हंगामात जंगलात व जंगलशेजारी शेतात वाघाने बळी घेतल्याच्या घटना जिल्ह्यात घडून आल्या आहेत. वनविभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले तरी सुद्धा मजुरवर्ग जीवाची पर्वा न करता वनात जातात. मात्र विपरीत घटना घडून जीव गमवावा लागतो. तेव्हा आता तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामाला सुरवात होणार आहे. वनविभागाच्या आदेशानुसार या कामाला सुरुवात होणार आहे तरी नागरिकांनी मजुरांनी कमालीची सावधानता बाळगत वनात प्रवेश करावा कारण वन हे जंगलाच्या राजाचे घर आहे. त्याच्या घरात जाने म्हणजे जीवावर उद्धार होऊन कामगिरी करणे होय म्हणून सतर्कता बाळगावी काळजी घ्यावी असे आवाहन दिक्षा शैलेंद्र पाटील यांनी केले आहे.
. या परिसरात हाताला काम नसल्याने मोठया प्रमाणात मजुरवर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला जातात. मात्र जंगलात हिंस्त्र पशूंचे वावर असल्याने जीवाला धोका होऊ शकतो. अश्या अनेक घटना मागील अनेक वर्षात घडल्या आहेत. वनविभाग सुद्धा याबद्दल आवाहन नेहमीच करीत असते अनेकदा दवंडी पिटते तर जाहिरात बाजी करून नागरिकांना सावध करते तसेच अनेक प्रकारच्या माध्यमातून नागरिकांना सूचित करते. मात्र नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी या बाबीकडे दुर्लक्ष करते तेव्हा सदर काम करताना सावधगिरीने करायला पाहिजे, काही आपत्ती आढल्यास वनविभागाला माहिती दिली पाहिजे, समूहाने जंगलात प्रवेश करायला पाहिजे, एकमेकांना आवाज देत सोबत राहायला पाहिजे असे अनेक प्रकारच्या सावधानता बाळगीत काम करायला पाहिजे तेव्हाच विपरीत घटना घडणार नाही याची काळजी मजुरांनी घेऊन कार्य करावे असे आवाहन दिक्षा शैलेंद्र पाटील यांनी केले आहे.


