ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाच्या नोंदीत घेण्याची गरज
देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष
मारोती चाफले
कोरपना : तालुक्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, किल्ला तटबंदी, बुरुज, प्राचीन मुर्त्या उपेक्षित अवस्थेत आहे. त्यांची साधी नोंद सुद्धा पुरातत्व विभागाच्या दरबारी नाही. यातच प्रशासनाकडूनही त्याची देखभाल व दुरुस्ती होत नाही. त्यामुळे हा वारसा लुप्त होण्याचे मार्गावर आहे.
. तालुक्यात परमार, चालुक्य, यादव, भोसले, गोंड, निजाम राजवटीसह बुद्ध, जैन वारसा आहे. परंतु हा संपूर्ण ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण असलेला वारसा आजही संरक्षित व संवर्धित करण्यात आला नाही. परिणामी त्यांची उपेक्षितपणामुळे दुर्दशा होत चालली आहे. हा वैभवशाली वारसा तालुक्यातील गडचांदूर, इजापुर, तामसी, कारवाही, दुर्गाडी, रुपापेठ, शेरज बूज, वनसडी, अंतरगाव, नारडा, सांगोडा, देवघाट, कढोली खुर्द, कारगाव बूज, पकडीगुड्डम, सिंगारपठार, माथा, कोडशी बूज, उमरहिरा, थिप्पा, घाटराई, लोणी, कुसळ, मागलहिरा, जेवरा, पारडी, पिंपरी, कोराडी, भोयगाव, इरई, आवरपूर, जांभूळधरा, चनई खू, चोपण, सावलहिरा आदी गावात आहे. त्याचे पुरातत्व विभागाकडून संशोधन होऊन त्याचे जतन होणे अपेक्षित आहे.


