चंद्रपुर : आगामी जनगणनेत जातनिहाय गणना समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबत घोषणा होताच ओबीसी विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून चंद्रपुरात जल्लोष करण्यात आला.
![]()
. मागील अनेक वर्षापासून ओबीसी संघटनांची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करताच चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात जनता कॉलेज परिसरात फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.


