९९ प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकऱ्या
सास्ती, कोलगांव व पोवणी चे पुणर्वसन होणार
वेकोली प्रशासन नरमले
कोरपना : राजुरा तालुक्यात बल्लारपूर वेकोलीक्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहे या कोळसा खाणी करिता अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहे. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला व नोकऱ्या देताना वेगवेगळ्या कारणाने वेकोलीने शेकडो प्रकरणे प्रलंबित ठेवलेले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह आमदार देवराव भोंगळे यांनी भर उन्हात आंदोलन स्थळी जाऊन वेकोलीची वाहतूक बंद केली.
. यावेळी वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक इलियास हुसेन नागपूर येथिल अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीतील मुद्देनिहाय सकारात्मक माहितीचा निरोप घेऊन स्वतः येऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या आमदार भोंगळे सोबत झालेल्या चर्चेनुसार दोन महिन्यात पूर्ण करणार असल्याचे सांगितले. ज्या मागण्या वाचून दाखविल्या त्यातील ९९ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या मिळणार असल्याचे संगितले. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी शेतकऱ्यांना मागण्या मान्य आहे काय विचारताच सर्वांनी मान्य असल्याचे सांगत आंदोलन मागे घेतले.
. यावेळी आमदार भोंगळे यांनी वेकोलि प्रशासनाला ठणकावून संगितले कि, कोणत्याही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये, वेकोलिने आपल्या अखत्यारीत येत असलेले प्रदूषणाचे, पुनर्वसनाचे, रस्त्यावरील धुळीचे यासह सर्व प्रश्न सोडविण्यास संगितले. समस्या न सोडविल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा ही त्यांनी दिला. यावेळी आंदोलनात प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


