Home चंद्रपुर जिल्हा विशेष कारवाईच्या भीतीने मोठे तस्कर कोमात ग्रामीण तस्कर जोमात

कारवाईच्या भीतीने मोठे तस्कर कोमात ग्रामीण तस्कर जोमात

969

ब्रम्हपुरी : अवैध रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या विरोधात सध्या जिल्ह्यातील गौण खनिज विभाग आणि जिल्हाधिकारी ऍक्शन मोड वर आल्याचे लक्षात येताच ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती घाटावर अवैध रित्या उत्खनन करून वाहतूक करणारे मोठे तस्कर काही दिवसापासून कोमात गेल्याचे दिसून येत आहे तर हेच मोठे तस्कर योग्य संधीची वाट पाहून कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील छोटे तस्कर मात्र जोरात अवैध रेती चा व्यवसाय करून मालामाल होत आहेत.

.       ब्रम्हपुरी तालुक्यात किमान बारा ते पंधरा रेती घाट आहेत. ब्रम्हपुरीच्या रेतीची मागणी जिल्ह्यात आणि जिल्हा बाहेर मोठा प्रमाणात आहे .त्यामुळे तालुक्यातील आणि शहरातील काही राजकीय वलय असलेल्या कार्यकर्त्यांना,स्थानिक नेत्यांना हाताशी धरून जिल्हा बाहेरील मोठे तस्कर रेतीच्या धंद्यात भागीदार बनवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बेकायदेशीरित्या नदी पत्राचे उत्खनन करून जिल्हा आणि जिल्हा बाहेर मोठ्या प्रमाणात हयवा सारख्या वाहनाने रेतीची बेभाव भावाने रेती विकली जाते.ही बाब नक्कीच नवीन नाही.

.     ब्रम्हपुरी तालुक्यातील नदी घाटाचे शासकीय नियमानुसार लिलाव झाले नसताना देखील प्रशासनाला हाताशी धरून कधी स्टॉक च्या नावाखाली तर कधी शासकीय कामाच्या नावाखाली अवैध रेतीचा गोरखधंदा सुरू आहे स्टॉक ठेवायचं जशाच तसे रात्री नदी पोखरायचे आणि काढलेला माल भरून त्याची वाहतूक करायचे जून ठेवायचं राखून त्याच्या नावाखाली नवीन नेहायच वाहून असा फंडा तस्कर वापरीत असतात.हा त्यांचा नित्यक्रम असला तरी सध्या गौण खनिज विभाग व जिल्हाधिकारी ऍक्टिव्ह मोड वर आल्याचे सांगण्यात येत असून त्यात आपल्यावरही कारवाई होऊ शकते या भीतीने सध्या तालुक्यातील मोठे रेती तस्कराच्या हालचाली मदावल्याचे दिसते सध्या मोठे तस्कर कोमात गेले असून त्याची जागा ग्रामीण भागातील राजकीय पुढारी व त्याचे कार्यकर्ते रेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने व गावा लगत नदी असल्याचा फायदा घेत भर दिवसा मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक करीत असल्याने सध्या त्यांचा रेतीचा व्यवसाय जोरात असून मालामाल होत आहेत.

error: Content is protected !!