वरोरा : लोकशिक्षण संस्थेद्वारा संचालित विविध शाळा महाविद्यालयांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी करिता आयोजित लोकमान्य प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांमध्ये लोकमान्य रॉयल्सने अव्वल स्थान पटकविले.
. याप्रसंगी आयोजित समारोपीय समारंभात लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष विकास घुडे, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, एडवोकेट दुष्यंत देशपांडे, संचालक डॉ. ब्रह्मदत्त पांडे, अनिल डोंगरे, मंगेश मल्हार, प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री, राहुल राखे, संजय आंबुलकर आदींची उपस्थिती होती.
. या प्रसंगी बोलताना प्रा. पाटील यांनी क्रिकेट खेळाच्या आयोजनाबद्दल कर्मचाऱ्यांचे यांचे कौतुक केले, तसेच आगामी काळात यामध्ये इतर खेळांचा समावेश करावा असेही ते म्हणाले. प्रा जोशी, एडवोकेट देशपांडे, प्राचार्य डोंगरे, डॉ. पांडे आदींनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
. या प्रीमियर लीग मध्ये लोकमान्य वॉरियर्स यांनी द्वितीय स्थान तर लोकमान्य किंग लॉयन्स यांनी तृतीय स्थान पटकाविले. सामनावीर पुरस्कार निलेश मजगवळी, उत्कृष्ट फलंदाज सुरेंद्र उरकांदे, उत्कृष्ट गोलंदाज अमोल सालवटकर, मालिकावीर आकाश धगवे आणि उत्तम झेलपटू म्हणून प्रयाग ठाकरे यांनी पुरस्कार पटकविले. एकूण २५ दिवस चाललेल्या या सामन्या चे संयोजन पंकज गहूकर, दशरथ चिकटे आणि लोकमान्य प्रीमियर लीगच्या सदस्यांनी केले.


