Home चंद्रपुर जिल्हा विशेष नरभक्षक वाघिणीचे दुरावलेले तीन बछडे सुरक्षित

नरभक्षक वाघिणीचे दुरावलेले तीन बछडे सुरक्षित

983

बछडे शोधण्यात वनविभागाला मोठे यश

उमा नदीच्या काठावर सापडले बछडे

रवी खाडे
 चंद्रपूर : शेतकरी, मेंढपाळ यांच्यावर हल्ला करून तीन जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीणीला तीन दिवसांपूर्वी वनविभागाने जेरबंद केले. या वाघिणीचे दुरावलेले तीन बछडे नियतक्षेत्र मूलमध्ये उमा नदीच्या परिसरात शनिवारी रात्री 1.30 वाजताच्या सुमारास पकडण्यात वनविभागाला मोठे यश आले. तिन्ही बछड्याना रात्रीच चंद्रपूर येथे वन्यजीव उपचार केंद्रात रवाना करण्यात आले.

.       नरभक्षक वाघिणीचे दुरावलेले बछडे शोधण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शंभर वनकर्मचारी, विशेष व्याघ्र संरक्षक विभागाचे कर्मचारी, पन्नास कॅमेरे, तीन लाईव्ह कॅमेरे, एक ड्रोन कॅमेरे यांची नजर होती. तीन बछड्याना पकडण्यासाठी उमा नदीचा परिसर, शेतशिवार, चितेगाव, मरेगाव येथे मागिल चार पाच दिवसांपासून दिवस रात्र मोहीम सुरू होती. बछडे पकडणे वनविभागा समोर मोठे आव्हानात्मक काम होते. शनिवारी रात्री नियतक्षेत्र मूल मध्ये उमा नदीच्या परिसरातील शेतशिवारात तीन बछडे एकत्र असल्याचे मूल येथील वनविभाागाच्या कर्मचा-यांना लक्षात आले. त्यांनी लगेच वरिष्ठांना कळविले.

.    तीन बछडे एकत्र रित्या नदीच्या काठावर फिरत होते. ही माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी योग्य प्रमाणात डॉट दिल्या नंतर शुटर अजय मराठे यांनी अचूक रित्या निशाणा साधला. आणि तीनही बछड्याना सुरूक्षित आणि आरोग्याने उत्तम असल्याचे वनविभागाने सांगितले.त्यांना पकडल्यानंतर रात्रीच चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले.मुख्य वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर,विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे,सावली वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांनी संयुक्त रित्या ही मोहीम राबविली.नरभक्षक वाघीण आणि तीन शावके जेरबंद झाल्याने वनविभाग आणि परिसरातील नागरिक,शेतक-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

तिघांचा बळी : तीन जखमी                                                                                                                                                              चितेगाव, आकापूर, मरेगाव, मूल आणि एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणारी वाघीण आपल्या तीन शावकासोबत फिरत होती. तिने एमआयडीसी परिसरात मेंढपाळ निलेश कोरेवार,चितेगाव येथे युवा शेतकरी शेषराज नागोशे आणि मूल मध्ये मेंढपाळ मल्लाजी येग्गावार यांच्यावर हल्ला करून ठार केले होते.तसेच तीघांवर हल्ला करून जखमी केले होते.

शेतक-यांनी सोडला सुटकेचा निःश्वास                                                                                                                                                     वाघीण आणि तीन बछडे जेरबंद झाल्याने वनविभाग आणि शेतक-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तीन जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीणीला बुधवारी जेरबंद करण्यात आले होते.त्यानंतर तिचे तीन बछडे दुरावल्या गेले होते. बछड्याना पकडण्यासाठी चितेगावच्या उमा नदीच्या परिसरातच पिंज-यात वाघीणीला ठेवण्यात आले होते.

बछड्याच्या शोधकार्यासाठी तयारी                                                                                                                                                नरभक्षक वाघिणीचे दुरावलेले बछडे शोधण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शंभर वनकर्मचारी, विशेष व्याघ्र संरक्षक विभागाचे कर्मचारी, पन्नास कॅमेरे, तीन लाईव्ह कॅमेरे, एक ड्रोन कॅमेरे यांची नजर होती.

error: Content is protected !!