भद्रावती : चंद्रपूर नागपूर महामार्गालगत असलेल्या भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे जगन्नाथ बाबा मठाच्या बाजूला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शनिवारी सायंकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली होती.
. जगन्नाथ बाबाच्या मठाजवळ शॉर्ट सर्किट होऊन सायंकाळी आग लागली. आग हळूहळू पसरत होती. आगीचा भडका नंदोरी बस स्थानका जवळ राहत असलेल्या नागरिकांना दिसला. आग लागल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यानी जगन्नाथ बाबाच्या मठाकडे धाव घेतली. आग लागली त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नसल्याने गावकऱ्यांनी हातात मिळेल त्याच्यात पाणी भरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानी आग आटोक्यात आली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, तलाठी रवींद्र लोंढे, माजी उपसरपंच प्रमोद जीवतोडे, मनोज ठेंगणे, दौलत एकरे, ईश्वर घोटकर, विजय उईके, राजू लांबट व गावकऱ्यांची सहकार्य केले.


