मदनापूर येथील घटना
नेरी : चिमूर तालुक्यातील मदनापूर येथील गावा लगत असलेल्या बिरजे यांच्या विहिरीत 21 वर्षीय तरुणाचा तोल जाऊन विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारला (दि.31) रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. राहुल मंगल शेंडे (21) रा.मदनापूर ता.चिमूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
. राहुल हा गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही. मदनापूर हेटी येथे त्याचे आई वडील राहतात.राहुल मात्र मदनापूर येथील आपल्या आजीकडे राहत होता. तिथे तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. . विहिरीच्या काठावर वडाच्या झाडाच्या सावलीत झोपल्याने त्याचा तोल जाउन विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळच्या सुमारास नागरिकांना त्याचे प्रेत विहिरीत तरंगताना दिसले
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांच्या मदतीने विहिरीत बाज टाकून त्यास विहिरीतून बाहेर काढण्यात आले व खाजगी गाडीत चिमूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाच्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी तालीकोटे यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.


