Home चंद्रपुर जिल्हा विशेष भरधाव स्कार्पिओची दुचाकीला जबर धडक

भरधाव स्कार्पिओची दुचाकीला जबर धडक

1024

भीषण अपघातात पत्नी ठार तर पती व मुलगा गंभीर जखमी

विहीरगाव जवळील घटना

नेरी : विहीरगाव वरून चिमूर कडे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली यात दुचाकीवरील एक महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 30 मार्चला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे.

.      पिपर्डा येथील भारत भेंडारे यांच्या घराचे वास्तूपूजन करून पती पत्नी आपल्या मुलाला घेऊन आपल्या स्वगावी पवनी जिल्हा भंडारा कडे जात असतानाच विहीरगाव कडून दवाखान्यात जात असलेल्या भरधाव स्कार्पिओ वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रिया राकेश जुमडे ( 28 ) रा. पवनी )हिचा जागेवरच मृत्यू झाला तर तिचे पती राकेश ताराचंद जुमडे ( 37 ) लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (4 ) हे गंभीर जखमी आहेत.

.         एमएच 33 – एफ 5151 या क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने समोर जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच 36 – व्ही 5001) जोरदार धडक दिली दुचाकी आणि चारचाकी वाहन फरफटत जाऊन शेतातल्या बांधित जाउन दुचाकी चारचाकी मध्ये अडकले आहे. धडक जबर दिल्याने महिला ठार झाली. तर या अपघातात तिचा पती राकेश ताराचंद जुमडे व लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे हा सुद्धा अपघातात जखमी झाले आहे. सदर कुटूंब राहणार पवनी जिल्हा भंडारा येथील असल्याची माहिती मिळाली आहे.हा अपघात आज रविवारला सायंकाळी साडे पाच च्या सुमारास घडला आहे.

.         दुचाकीला धडक देणारी स्कार्पिओ ही विहीरगाव येथील मंगेश ननांवरे यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली असून चालक विना लायसन्स मद्यप्राशन करूनच गावातूनच भरधाव वाहन चालवीत जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.चालक म्हणून निलेश रंदिये नामक व्यक्ती असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!