चंद्रपुर : गांधी उद्यान योग मंडळ वरोरा च्या वतीने. गुढीपाडवा विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. रविवारी वरोरा शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे यांनी सुद्धा या बाईक रॅलीत सहभाग घेतला होता.
. गुढीपाडवा हा सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने शहरात विविध उपक्रम राबवित रॅली काढण्यात आली होती. तर उंचच उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले गेले. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळले.

![]()


