Home चंद्रपुर जिल्हा विशेष शिक्षन विभागाचा समाजकल्यान विभागाकडे चौकशी अहवाल

शिक्षन विभागाचा समाजकल्यान विभागाकडे चौकशी अहवाल

1034

वसतिगृहात मारहाण प्रकरण

उपविभागीय अधिकारी यांची सूचना

चिमूर : तालुक्यातील बोथली ( वाहानगवाव) येथील श्री गजानन मुलांचे वसतिगृहात चार विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. यात सर्वस्वी दोषी व्यवस्थापन मंडळ असल्याचा सूर सर्वत्र उमटून येत आहे. त्याचे पडसाद विविध स्तरावरून उमटले आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांना चौकशीच्या सूचना केल्या त्याच पार्शवभूमीवर शिक्षण विभागाने जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांना चौकशी अहवाल सादर करून कारवाई साठी पत्र दिले आहे.

.     सविस्तर वृत्त असे की, श्री गजानन मुलाच्या वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या लोकेश श्रावण भादककर या विद्यार्थ्यास याच ठिकाणी वास्तव्यास असणारे आदर्श जितेंद्र मेश्राम, अंशुल विजय इखारे, वंश गजानन मांडवकर व यश दिनेश खडसे या चार विद्यार्थ्यांनी मिळून बेदम मारहाण केली. याकडे व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले.

.      सदर प्रकरण उघडकीस येताच उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी कर्मचारी,विद्यार्थी व पालक यांचे मत जाणून घेतली व शिक्षण विभागाला चौकशीच्या सूचना केल्या होत्या.दरम्यान शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांनी चौकशी अहवाल पूर्ण करून गट शिक्षण अधिकाऱ्यांना सुपूर्त केला असून आता गट शिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांनी जिल्हा परिषद चे समाज कल्याण अधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी चौकशी अहवाल सादर केला आहे.

.     या वसतिगृहातील अधीक्षक सतत गैरहजर असतात, एक चौकीदार व स्वयंपाकी महिला आहे यावर कारभार चालतो पण चौकीदार अनुपस्थित असल्यावर विद्यार्थ्यांवर नियत्रन नसते तसेच या वसतिगृहात विद्यार्थ्यांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आता यात समाज कल्याण विभागाचे अधिकारी व्यवस्थापनावर काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

व्यवस्थापनाविरोधात वसतिगृह परिसरात आंदोलन                                                                                                                            या प्रकरणात सामाजिक दायित्व समजून डॉ. भंते धम्मचेती यांनी पीडित मुलासह पोलीस तक्रार केली होती व समाज कल्याण आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना योग्य कारवाई साठी निवेदन दिले होते. आज सोमवार ला वसतिगृह परिसरात भंते धम्मचेती यांचे नेतृत्वात शेकडो स्वयंसेवक नागरिकांनी निषेध आंदोलन करीत दोषी व्यवस्थापन मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली.

उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल सोमवारला समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद कडे सोपविण्यात आला आहे.                                                                                                                                 रुपेश कांबळे,                                                       गटशिक्षणाधिकारी पं. स.चिमूर

error: Content is protected !!