वनविभागला यश
पाच महिन्यापासून शेतकरी, नागरिकासहित वनविभागाची उडवली होती झोप
सरडपार-मोखाळा नदीघाटात मोहीम राबवून केले जेरबंद
नेरी : नेरी परिसरात अनेक गावांत हैदोस माजवीत हाहाकार माजवणाऱ्या व वनविभागाची झोप उडवणाऱ्या त्या वाघिणीला सरडपार – मोखाळा नदिघाटात ट्रॅप लावून दि 24 मार्च च्या पहाटे पाच वाजता पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले.
. मागील पाच महिन्यापासून एका मोट्या पट्टेदार वाघिणीनी नेरी परिसरात प्रवेश करून नदी नाले तसेच शेतातील पिकांचा आसरा घेत बस्तान मांडले होते या दरम्यान त्या वाघिणीने अनेक महिला मजुरांना जखमी केले तसेच नागरिकांना दर्शन देऊन दहशत निर्माण केली होती ट्रॅक्टरचा पाठलाग केला अनेक महिला मजुरांचा पिच्छा करून शेतातून हाकलले शेतकऱ्यांनी दहशतीत शेती कसली होती या कालावधीत वाघिणीने अनेक प्राळीव प्राण्यावर ताव मारीत गाई बैल बकऱ्या यांना ठार केले होते यामुळे वनविभागाची झोप उडविली होती. नुकतेच गाईला मारून नदिघाटात वास्तव्य करून ठाण मांडले होते तेव्हा वनविभागाने हीच संधी साधून वाघिणीचा ट्रॅप लावून जेरबंद करण्याची योजना आखली आणि वाघिणीच्या त्रासातून सर्वांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला
. या मोहिमेला साकार करण्यासाठी वनविभागाचे सहाययक वनसंरक्षक गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ निशिकांत खोब्रागडे, बायोलाजिस्ट राकेश आहुजा, शूटर मराठे आणि त्यांची सर्व चमू यांनी कामगिरी बजावली, क्षेत्रसहायक रासेकर, वनरक्षक वडझे,वनरक्षक पाटील आणि त्याची संपूर्ण टीम च्या नेतूत्वात वाघिणीचा ट्रॅप करून तिला जेरबंद करण्यात यश प्राप्त केला सदर वाघिणीला नागपूर येथे स्थलांतरित केले असल्याची माहिती आहे.


