अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसून शिमगा साजरा करणार
संगणक परिचालकांची होळी की शिमगा
राज्याध्यक्षा सुनीता आमटे यांचा प्रशासनास रोख सवाल
संजय रामटेके
मोहाडी : संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या संगणक चालकांचे मागील 6 महिन्यापासून मानधन झाले नसल्याचा प्रकार समोर येत आहे. एकीकडे कामाचा वाढता तान शासनाच्या विविध योजना, वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी डेडलाईन मध्ये अद्यावत करून द्यायचे अहवाल, ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समिती अधिकारी यांच्या वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचे पालन, शिवाय गावातील नागरिकांना वेळोवेळी द्याव्या लागणाऱ्या दाखले, विविध कामाचे ओझे वजा जबाबदारी संगणक परिचालक सांभाळत असतो. या सोबतच कुटुंबाप्रती त्याच्या असलेल्या जबाबदारी देखील सांभाळून घ्यावी लागते.
. कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा म्हटला की पैसा लागतोच मग सहा सहा महीने कामाचा मोबदला जर संगणक परिचालक यांना मिळाला नाही तर त्यांनी खायचं काय आनी कुटुंबाला जगवायचं कस? हा गंभीर प्रश्न संगणक परिचालक यांच्या समोर पडला आहे. वीज बिल, मुलांचं आरोग्य शिक्षण, किराणा, गॅस, कपडा लत्ता आणायचा कुठून? उधारीवर घ्याच म्हटलं तरी काय काय घेणार आनी कुठपर्यंत दुकानदार देणार त्यामुळे संगणक परिचालक वैफलैग्रस्त होताना दिसते आहे काही संगणक परिचलकांच्या कुटुंबात आर्थिक चनचणी मूळे कौटुंबिक कलहाला सुरवात झाली असुन कुटूंब व्यवस्था उध्वस्थ होण्याच्या मार्गांवर आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचे थकीत मानधन करावे अन्यथा पुणे येथे जबाबदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करत शिमगा साजरा करू असा अल्टीमेटम निवेदनाद्वारे ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या राज्यध्यक्ष सुनीता आमटे यांनी दिला आहे.


