नागभीड : तालुक्यातील तळोधी (बा.) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान येथे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य तर्फे विदर्भातील संपूर्ण कलावंतांसाठी ‘नोंदणी महामेळावा व कलाकार सन्मान’ सोहळ्याचे आयोजन रविवार दि. 9 मार्च रोजी करण्यात आले.
. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांची उपस्थिती लाभली होती.तर प्रमुख अतिथी म्हणून समितीचे राष्ट्रीय संघटक बलराज आहेर, समितीचे उत्तर प्रदेश अध्यक्ष जगदीश सोनवाने,मिननाथ बगमारे महाराज,समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. देवानंद पिल्लारे महाराज, गडचिरोली जिल्हाध्यक्ष धनपाल कार,वसंत बडवाईक सुधाकर कोकाटे,पुष्पलता बोरकर, नाट्यकलावंत अमरकुमार मसराम, सेवा निवृत्त शिक्षक बबन गुरनुले,साहित्यिक राजेश बारसागडे, भारत चुनारकर आदींची उपस्थिती होती.विविध कला क्षेत्रातील वृद्ध कलावंतांच्या या महामेळाव्यात अनेक वृद्ध कलावंतांचा शाल,सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये पुष्पलता बोरकर,वसंत बडवाईक, आत्माराम आंबोरकर,लक्ष्मण लोणबले,सुधाकर कोकाटे, अमरकुमार मसराम,शंकर गिरडकर,संगीत शिक्षक बत्तूलवार,शिक्षक विलास बोरकर,ग्रामगिताचार्य डॉ.रामजी गभने,महाराष्ट्र शासन ‘बालकवी’ पुरस्कृत साहित्यिक,पत्रकार राजेश बारसागडे,शिक्षक प्रेमदास मेंढुळकर,विजय करंडे,प्रणय बांगरे, संगीत शिक्षक संजीव बनकर,आदीं विदर्भातील विविध क्षेत्रातील कलावंतांचा समावेश होता.
. या महामेळाव्यात संपूर्ण विदर्भातील कला क्षेत्रातील सर्व वयोगटातील कवी, गायक, साहित्यिक, लेखक,
अभिनय, निर्माता, दिग्दर्शक, नाटककार, संगीत विशारद, शास्त्रीय गायन, सुगम गायन, भजनी मंडळ, कीर्तनकर, भारुडकार, प्रवचनकर, तमाशा कलावंत, झाडीपट्टी कलावंत आदीं या सर्व कलावंतांची नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांनी उपस्थित कलावंतांना वृद्ध कलावंत मानधन योजनेच्या अनेक बाबीवर मार्गदर्शन केले.व कलावंतांच्या न्याय हक्कासाठी ही समिती सतत कार्यशील राहणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी पिल्लारे महाराज बलराज आहेर, धनपाल कार, राजेश बारसागडे, बबन गुरनुले यांची सुद्धा मार्गदर्शनपर भाषणे झालीत. या कार्यक्रमाचे संचालन व आभार शुभम मसराम यांनी केले.या कार्यक्रमाला विदर्भातील विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी उपस्थिती दर्शविली होती.


