Home चंद्रपुर जिल्हा विशेष मोहाळी मोकासा येथील पोलीस पाटील पदाचा पदभार कुणाकडे ?

मोहाळी मोकासा येथील पोलीस पाटील पदाचा पदभार कुणाकडे ?

1064

मोहाडी : नागभीड तालुक्यातील मोहाळी मोकासा येथील पोलीस पाटील पदाचा तिढा गेली अनेक वर्ष पासुन म्याट (न्यायालयात) मध्ये सुरु आहे.

.   त्यामुळे सदर पदाचा पदभार कोनाकडे तरी असायला पाहिजे जेणेकरून गावातील नागरिकांना अडचण येणार नाही. बऱ्याचवेळा वारसान प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजना,रहिवासी प्रमाणपत्र यासाठी पोलीस पाटिलांचा दाखला मागवला जातो, याशिवाय तंटामुक्ती समित्या असो वा तलाठी यांना वेळेवर मदत करने देखील या पोलीस पाटील यांचे कडुन आवश्यक असते कारण ते स्थानिक असतात आनी गावातील संपूर्ण माहिती त्यांना असते मात्र सध्या मोहाळी मोकासा गावात पोलीस पाटील कार्यरत नाहीत तर नागरिकांनी दाखला घ्यायचा कोणाचा हा प्रश्न निर्माण होत आहे.. शेजारच्या कुणघाडा चक गावातील पोलीस पाटीलकडं पदभार असेल म्हणुन नागरिक जातात मात्र त्यांनी हात वर केल्यामुळे तसेच दाखल्यावर किंवा मोहाळी मोकासा येथील तंटामुक्ती समितीच्या एखाद्या तंटा सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस येण्यास टाळाटाळ केल्यावर गावातील लोकांना विनाकारण मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असुन नागरिकांना रिकाम्या हाताने परत यावे लागत असल्याने नागरिकांनाचा वेळ आनी पैसा नाहक वाया जात आहे. तेव्हा मोहाळी मोकासा येथील पोलीस पाटील पदाचा पदभार नेमका कोणाकडे आहे हें वरिष्ठ कार्यालया मार्फत जनतेसाठी जाहीर करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!