Home सामाजिक जागतिक महिला दिनी क्षयरुग्णांना घेतले दत्तक

जागतिक महिला दिनी क्षयरुग्णांना घेतले दत्तक

1045

डॉ. अमित चिद्दमवार यांचा उपक्रम

चार क्षयरुग्णांना निक्षय आहार वाटप

राजुरा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत त्याच तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस आल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित चिद्दमवार यांनी प्रधानमंत्री क्षयमुक्त अभियान अंतर्गत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील चार रुग्णांना निक्षय पोषण आहारासाठी दत्तक घेत (दि. ८) रोज शनिवारला पोषण आहार कीटचे वाटप वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव यांच्या हस्ते डॉ. शेख व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पाटप करीत मुलीचा वाढदिवस साजरा केल्याने सर्वत्र या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

.      वाढदिवस म्हणजे मित्र मैत्रिणींचा गोतावळा, आलिशान हॉटेल मध्ये रंगीत पार्टी, डीजेच्या तालावर थरकनारी युवा मंडळी. त्या नाच गाण्यात बेभान होऊन रंगलेली मित्र मंडळी यात हजारो रुपयाचा होणारा खर्च यासर्व बाबीला फाटा देत डॉ. अमित चिद्दमवार यांनी ते ज्या रुग्णालयात सेवा देत आहे त्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात क्षयरोगांनी ग्रस्त रुग्णांचा एक आपुलकीचा हात म्हणून औषधोपचार संपेपर्यंत दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.

.      नेहमी सेवाभावृत्ती जोपासणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. चिद्दमवार हे आपल्या परिवारातील सदस्याचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करीत असते. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असताना प्रत्येक रुग्णांची आपुलकीने विचारपूस करीत रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणून प्रख्यात आहे. त्यांच्या या कार्याबद्दल वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव यांनी कौतुक केले आहे.

error: Content is protected !!