सीताफळाचे बन जळून राख
वरोरा : तालुक्यातील खेमजई येथील एका शेतकऱ्याने शेतातील कचरा पेटवीला. मात्र हळूहळू आज धुऱ्या धुऱ्याने कुपळत गेल्याने परिसरातील. सीताफळाचे बन जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास वरोरा तालुक्यातील खेमजई शेतशिवारात घडली.
. आग विझविण्यासाठी दुपारी अग्निशमकं वाहन दाखल झाले होते. दुपारी आगी वर नियंत्रण मिळवत अग्निशमकं वाहन निघून गेले. मात्र पुन्हा सायंकाळी आगीने रुद्र रूप धारण केले. वृत्त लिहीपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.


