उन्हाचा पारा वाढल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास
आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता
नेरी : सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाचे चटके बसायला सुरवात झाली आहे. मात्र प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दुपार पाळीत सुरू असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो तेव्हा शालेय प्रशासनाने दखल घेऊन सकाळ पाळीत शाळा घ्यावे अशी मागणी सरपंच दीक्षा पाटील यांनी केली आहे.
. यावर्षी मार्च महिन्यातच सूर्याने आग ओकायला सुरवात केल्याने लवकरच उन्हाळ्याला सुरवात झाल्याचे भासत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी बस, सायकल तसेच अन्य साधनाने शिक्षण घेण्यासाठी शहरी भागात जात आहेत. मात्र या उन्हामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होताना दिसत असून उन्हाच्या चटक्यांनी त्यांची एकाग्रता भंग होताना दिसत आहे गर्मी मुळे त्यांचे लक्ष विचलित होत असल्याची व मानसिकता बदलत असल्याने शाळेत लक्ष लागत नसल्याने परिपूर्ण शिक्षण होत नाही तसेच उन्हाचे विपरीत परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सकाळ पाळीत शाळा सुरू केल्यास विदयार्थी हे सुरक्षित शाळेत येथील शिक्षणात त्यांचे मन लागेल शिक्षणाची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होईल आणि प्रफुल्लीत मनाने विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील तसेच इतर समस्या उद्भभवणार नाहीत सकाळचा प्रवास सुरळीत राहील या सर्व कारणांनी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही तेव्हा शासनाने प्राथमिक माध्यमिक शाळा सकाळ पाळीत घ्यावे अशी मागणी सरपंचां दीक्षा पाटील यांनी केली आहे.


