Home चंद्रपुर जिल्हा विशेष पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख स्थानबद्ध

पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख स्थानबद्ध

1086

एमपीडीए कायद्यानुसार जिल्हाधिकारी यांचे आदेश

माजरी : दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ गुड्डु असलम शेख याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई त्याच्यावर करण्यात आली.

.       चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठाण्यात पोलीस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दंगा करणारा, सर कर्म हमला, खुनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणारा व्यक्ती नामे शाहरूख उर्फ गुड्डु असलम शेख (२६) रा. बांदा दफाई माजरी कॉलरी यांचेवर पो. स्टे. माजरी, वणी जि. यवतमाळ, घुग्घुस, भद्रावती, वरोरा, राजुरा येथे चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दंगा करणारा, सर कर्म हमला, खुनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे असे एकुण १६ गुन्हे दाखल असुन त्याची परीसरामध्ये दहशत आहे. त्याने सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असुन, शाहरुखने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा आरोपी कायद्याला जुमानत नसल्याने याची जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दखल घेवुन सदर इसमावर महाराष्ट्र झोपडप‌ट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीयो पारेट्स) वाळु तस्कर अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सन १९८१ (सुधारणा २००९, २०१५) अन्वये प्रस्ताव तयार करून विनय गौडा जिसी, जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला असता, त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवुन प्रस्तावित इसम नामे शाहरूख उर्फ गुडडू असलम शेख यास नमुद कायद्याअंतर्गत १ वर्षा करीता स्थानबध्द करण्याबाबत शनिवारी (दि. १ मार्च) आदेश पारीत केलेला आहे. सध्या शाहरुख उर्फ गुड्डु असलम शेख हा चंद्रपूर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंगात आहे.

.    सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा नयोमी साटम, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच माजरीचे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी मोलाची कारवाई केली. यापुढे सुध्दा सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल.

 माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना कठोर शासन व्हावा यासाठी ही कारवाई असून, गुन्हेगारांनी परिसरात दहशतीसाठी केलेली कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाईचे धोरण निश्चित आहे.                                                                                                                          अमितकुमार पांडेय,                                                                 ठाणेदार माजरी

error: Content is protected !!