Home सामाजिक महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद उत्कृष्ट लेखक डाँ. राजेश डोंगरे यांना पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद उत्कृष्ट लेखक डाँ. राजेश डोंगरे यांना पुरस्कार प्रदान

1077

कोरपना : गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत प्रा. डाँ.राजेश सुधाकर डोंगरे यांच्या वाणिज्य विभागात विवेकपूर्ण व अभ्यासपूर्ण लिखाणाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेकडून त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद उत्कृष्ट लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

.      संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये वाणिज्य विद्याशाखे अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या पाचही विद्यापीठांमध्ये वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांचे लेखन झाले आहे आजतागाय डॉक्टर राजेश डोंगरे यांचे 47 पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच संशोधन क्षेत्रात राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एकूण विविध 51 विषयावर संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. एवढेच नव्हे तर प्रा. डॉ. राजेश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीसाठी विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहे.

.      शिक्षण क्षेत्रातील उच्च समजल्या जाणाऱ्या आचार्य पदवीचे मूल्यमापन करण्यासाठी व आचार्य पदवीसाठी सादर करण्यात येणाऱ्या संशोधन प्रबंधाचे मूल्यमापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाच्या पॅनलवर डॉ. राजेश डोंगरे यांनी काम बजावले आहेत महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी महाराष्ट्र व देशातील शेकडो नामवंत लेखकांनी नामांकन दाखल केले होते. महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेकडून डॉक्टर राजेश डोंगरे यांना महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद उत्कृष्ट लेखक पुरस्कार प्राप्तीसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यानिमित्य वंदनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव तथा प्राचार्य अनिल मुसळे व संचालक मंडळ तसेच गुरुकुल महाविद्यालय तथा सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!