Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोऱ्यात गांजा विक्रेत्यावर वरोरा पोलीसांची धाड

वरोऱ्यात गांजा विक्रेत्यावर वरोरा पोलीसांची धाड

1103

एक किलो गांजा जप्त

वरोरा : शहरातील यात्रा वार्ड येथील वडार मोहल्ल्यात एका इसमाने गांजा विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती वरोरा पोलिसांना मिळताच वरोरा पोलिसांनी धाड टाकत १ किलो ७५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.

.      पोलीस सूत्रानुसार दि.०१ मार्च ला वरोरा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून गोपनिय माहीत मिळाली की, यात्रा वार्ड वडार मोहल्ला वरोरा येथील पोचमल्लु दांडेकर हा स्वतःचे राहते घरी मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया विक्रीकरिता आणले आहे. या माहीतीवरून ठाणेदार अजिंक्य तांबडे हे आपल्या पथका सह यात्रा वार्ड वरोरा येथील पोचमल्लु मधुकर दांडेकर (३७ ) रा. यात्रा वार्ड वडार मोहल्ला वरोरा येथे पोहचत त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याचे घरात स्वतःच्या आर्थिक फायदया करीता मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया यांची विक्री करण्याकरिता सदर आरोपीच्या घरी १ किलो ७५० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आल्याने त्याचे विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाक करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब), ii (ब) एनडीपीएस . ऍक्ट कायदा अन्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी रिजवान रंगरेज यास पोलीसांची चाहुल लागताच पसार झाला.

.        सदरची कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सहायक पोलीस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सपोनि. शरद भस्मे, पोउपनि दिपक ठाकरे, पो. अं. संदीप मुळे, पो. अं. विशाल राजुरकर, पोहवा मोहन निषाद, संदीप वैदय, दिलीप सुर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे, महेश गावतुरे यांनी केली.

error: Content is protected !!