नेरी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा म्हसली व ग्रामपंचायत म्हसली च्या वतीने जी प शाळेचे सहाय्यक शिक्षक नारायण उताने हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा दि 28 फेब्रुवारी ला जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सेवानिवृत्तीपर सत्कार, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन त्यांचा विधिवत सत्कार करून निरोप देण्यात आला.
. सदर निरोप समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच संकेत सोनवाणे,उपसरपंच चारुशीला कावरे,मुख्याध्यापक केळझरकर पोलीस पाटील श्रीराम धारणे, शा व्य स अध्यक्ष हरींचंद्र सोनवाणे उपस्थित होते यावेळी उताने सरांचा विधिवत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गावकरी व विद्यार्थ्यांनी भेटवस्तू देऊन गौरविले. सदर कार्यक्रमाला गावकरी ग्राप व शालेय प्रशासनाने वर्गणी करून सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले.
. यावेळी मान्यवरांनी सरांबद्दल माहिती देऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत केली आणि त्यांच्या हातून किती विद्यार्थी घडले याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य- पद्माकर पेंदाम. अश्विनी धारणे. मंगला देवतळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उपस्थितीत होते. मयुरी ढोले, प्रशांत तडस, मनीषा अष्टकर आणि गावकरी सर्व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते स्नेहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.


