सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे पार पडला उदघाटन सोहळा
नागभीड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थिती मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय बाळ स्वास्थ कार्यक्रमाअतर्गत विद्यार्थ्यांच्या विशेष तपासणी मोहीमेचा राज्यस्तरीय उदघाटन सोहळा ॲानलाईन १ मार्च रोजी पार पडत असतांना या मोहिमेचा नागभीड तालुका स्तरीय उदघाटन सोहळा सरस्वती मंदिर मंदिर, नागभीड येथे शाळा अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते पार पडला.
. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे, शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उदघाटक संजय गजपुरे यांनी राज्य शासनाच्या या मोहिमेचे स्वागत करीत विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले , तर डॉ. विनोद मडावी यांनी विद्यार्थ्यांनी जंक फूड च्या मागे न लागता सकस आहार घेण्याच्या सूचना दिल्या व तालुक्यात सुरु असलेल्या या अभियानाची माहिती देत सर्व नागरिकांनी आयु्ष्यमान गोल्ड कार्ड काढण्यासाठी आवाहन केले.
यानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उपस्थित आरोग्य पथकाद्वारे करण्यात आली.
. या पथकात डॉ. सीमा खरकाटे, डॉ. दिलीप फटिंग, डॉ. विभव दहीकर, डॉ.श्रद्धा डांगरे, डॉ.भाग्यश्री आखाडे, सुपरवायझर सलामे, औषध निर्माता आशिष सहारे, लक्ष्मी दर्वे, परिचारिका प्रियांका मैदमवार, रोशनी टिकले, अर्चना पोवळे यांच्यासह ग्रामीण रुग्णालय नागभीड, प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव, आपला दवाखाना नागभीड चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले तर आभार किरण वाडीकर यांनी मानले, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथील शिक्षकांनी प्रयत्न केले.


