Home चंद्रपुर जिल्हा विशेष राजुरा बस स्थानक ठरत आहे प्रवाशांसाठी डोकेदुखी

राजुरा बस स्थानक ठरत आहे प्रवाशांसाठी डोकेदुखी

1141

बस थांबण्यासाठी दुसऱ्या जागेची पर्यायी व्यवस्था करा

विद्यार्थी संघटना आंदोलन करणार

प्रविन मेकर्तीवार

   राजुरा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभागातील राजुरा हे सर्वात मोठे आगार आहे. या आगाराची इमारत जुनी झाल्याने नव्याने बस स्थानक बांधणीला मंजुरी मिळाली. मात्र जुने बस स्थानक तोडून त्याच ठिकाणी नव्या बस स्थानकाचे काम सुरु केल्याने बसेस रस्त्यावर उभ्या केल्या जात आहे. तर उन्हाळ्यात प्रवासी, विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तर रस्तावर बस थांबत असल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकारामुळे राजुराचे बस स्थानक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

.     राजुरा हे औद्योगिक शहर आहे आणि येथे वाहतुकीसाठी रेल्वे ची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वांची लाडकी लाल परी हीच एकमेव पसंतीची वाहतूक व्यवस्था आहे परंतु एरवी या लाल परी ने प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन बाहेर निघणे अशी परिस्थिती राजुरा बस स्थानकावर पाहायला मिळत आहे. राजुरा येथे जुने बस स्थानक होते परंतु प्रवाशांची गर्दी आणि पुरातन बांधकाम असल्याने नव्याने बस स्थानक बांधणीला मंजुरी मिळाली आणि सर्व प्रवाशी अतिशय आनंदी झाले.आपल्याला अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले बस स्थानक मिळणार परंतु त्या आनंदापुढे सध्या प्रवाशी हवालदिल झाले आहेत, राजुरा येथे असलेले जुने बस स्थानक तोडण्यात आले आणि त्याच ठिकाणी नवीन बस स्थानक उभारण्याचे काम सुरु केले आहे परंतु असे करत असताना प्रवाशांची गैर सोय होणार नाही या कडे लक्ष देणे गरजेचे होते परंतु प्रवाशांची गर्दी आणि उन्हाळा आणि बस स्थानकावर बस ठेवायला जागा नाही आणि प्रवाशांना बसायला पुरेशी जागा नाही, बस स्थानकावर जागा नसल्याने चालक बस मेन रोड वर उभे करत आहेत आणि प्रवाशी बस पकडण्यासाठी धावपड करीत आहेत या धावपळीत मोठा अपघात होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

.       या धावपळीत अनेक चालकाला बस ची नोंदणी सुद्धा करण्यास अडचण येत आहे, आणि बस स्थानका समोरील रस्ता हा जास्त वर्दळीचा रस्ता आहे त्यामुळे रोड वर सुद्धा बस जास्त वेळ उभी ठेवू शकत नाही या सर्व अडचणी मुळे शालेय विद्यार्थी, प्रवाशी, महिला, जेष्ठ नागरिक यांची चांगलीच गोची होत आहे. जर येत्या चार दिवसांत बसेस थांबण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी आणि प्रवाशी, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक यांना बस स्थानक आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी अन्यथा विद्यार्थी संघटना राजुरा च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रविन मेकर्तीवार यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!