Home चंद्रपुर जिल्हा विशेष वासेरा गावात मध्यवस्तीत घुसला बिबट

वासेरा गावात मध्यवस्तीत घुसला बिबट

1131

⭕ संजय कुसाम यांच्या बकरीचा पाडला फडशा

⭕ ८ दिवसापासून बिबट्याची दहशत कायम

⭕ वनविभागाची बघ्यांची भूमिका

सिंदेवाही : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय शिवणी अंतर्गत येत असलेल्या वासेरा येथे मागील आठ दिवसापासून बिबट्याची दहशत कायम असून शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गावातील मध्य वस्तीत घुसून संजय मारोती कुसाम यांच्या बकरीला बिबट्याने ठार केले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

.       ताडोबा बफर झोन क्षेत्राच्या कुशीत वसलेल्या वासेरा गावात मागील आठ दिवसापासून बिबट्याची चांगलीच दहशत सुरू आहे. २७ फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते साडे बारा वाजताच्या दरम्यान गजानन मेश्राम हे आपल्या घरासमोर दरवाज्यात बसून असताना बिबट्या घराच्या मागून आला. आणि अंगणातून नाटकाच्या थिएटर्स कडे गेला. सुदैवाने गजानन मेश्राम याना बिबट्याने कोणताही धोका केला नाही. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी सुद्धा बस स्टँड चौक पासून बिबट्या गावात आला. आणि देवाजी सोयाम यांचे घराजवळून धनजंय महाविद्यालय कडे गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पुन्हा १ मार्च रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास विनोद काटेकर किराणा स्टोअर्स जवळील दाट वस्तीत घुसून संजय मारोती कुसाम यांचे बकरीला ठार केले आहे. बिबट्या मानवी वस्तीत घुसून रात्रभर सैरावरा फिरत असल्याने रात्री बेरात्री लघु शंकेला उठणाऱ्या नागरिकांना प्रचंड भीती निर्माण झाली आहे. असे असताना मात्र वन विभाग बघ्यांची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाला याबाबत माहिती असूनही बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा बिबट्याची खात्री करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ट्रॅप कॅमेरे किंवा लाईव्ह कॅमेरे अजून पर्यंत कुठेही लावण्यात आलेले नाही. नागरिकांनी आपले संरक्षण करण्यासाठी स्वतः फटाके फोडून बिबट्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा – ग्रामस्थ                                                                                                                                        शनिवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान बिबट्या गावातील मध्यवस्तीत घुसून बकरीला ठार केले असल्याने गावाच्या टोकावर राहत असलेल्या नागरिकांना बिबट्याची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. वनविभागाने सदर बिबट्याचा कायमचा बंदोबस्त केला नाही. तर बिबट्या माणसावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी या गंभीर बाबी कडे तात्काळ लक्ष घालून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

error: Content is protected !!