Home चंद्रपुर जिल्हा विशेष शिकारीच्या तयारीत असलेल्या शिकाऱ्यांवर वन विभागाची कारवाई

शिकारीच्या तयारीत असलेल्या शिकाऱ्यांवर वन विभागाची कारवाई

1115

वरोरा : वन परिक्षेत्रात संशयास्पद फिरत असलेल्या चार जणांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ते वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या तयारीत होते. त्याच्याकडून शिकारींसाठी वापरण्यात येणारे शस्त्र वनविभागाने जप्त केले आहे.

.      प्राप्त माहितीनुसार मौजा महालगाव (खु.) कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये दिनांक 13 फेब्रुवारी ला रात्रौ 9.30 वाजताचे दरम्यान वनकर्मचारी एस. के. शेंडे वपअ वरोरा, डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, ब्रम्हणाथ वनरक्षक रामपुर, रोजनदारी वनमजुर व पि.आर.टी. टिम गस्त करीत असतांना वनपरिक्षेत्रात चार जण हातात साहित्य घेऊन संशयास्पद रित्या फिरत असताना वनविभागाच्या पथकाने आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल सर्व राहणार हिरापुर पो. कोसरसार ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर व संदिप बालीकचंद्र शेरकुरे रा. धोपटाळा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर हे कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये संक्षयास्पद अवस्थेत आढळून आले. त्यांची विचारणा केली असता ते वन्यप्राण्याची शिकार करण्याकरीता आल्याचे सांगितले. त्यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य वाघुर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन, मोबाईल जप्त करण्यात आलेले असुन त्यांचावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 2(16) व 51 अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोर्पीना त्याब्यात घेऊन कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायलय वरोरा येथे दिनांक 14 रोजी हजर करण्यात आले.

.     पुढील चौकशी व्हि. श्री. तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्हि. वेदांती वनरक्षक महालगाव, करकाडे, केजकर, ब्रम्हनाथ वनरक्षक करीत आहे.

error: Content is protected !!