उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पक्षप्रवेश
चंद्रपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गुरुवारी ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठाला मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.
. वरोरा मतदारसंघातील बंडखोरी आणि राजकीय शक्तीप्रदर्शन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा मतदारसंघ हा नेहमी शिवसेनेच्या ताब्यात असताना, महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडली होती. मात्र, शिवसेनेची ताकद लक्षात घेता मुकेश जीवतोडे यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार काकडे यांना मागे टाकत जीवतोडे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी मिळवलेली मतसंख्या आणि जनतेचा मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेता, “उबाठाने ही जागा स्वतःकडे ठेवली असती, तर मुकेश जीवतोडेच विजयी झाले असते,” असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.त्यांच्या या निर्णयाने वरोरा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून, आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अंतर्गत गटबाजी व महाविकास आघाडीतील घराणेशाहीचा विरोध “गेल्या तीन वर्षांत पक्षांतर्गत गटबाजीमुळे पद आले, पद गेले, असे अनेक अनुभव आले. मात्र, महाविकास आघाडीतील घराणेशाही वाढीस लागल्याने आणि कार्यकर्त्यांचे हित दुर्लक्षित होत असल्याने मी उबाठाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहे,”
मुकेश जिवतोडे


