Home चंद्रपुर जिल्हा विशेष पीएचसी चौकाने घेतला मोकळा श्वास

पीएचसी चौकाने घेतला मोकळा श्वास

1129

ग्रामपंचायतची अतिक्रमण हटाव मोहिम

नेरी :  शहराचा मुख्य प्रवेशद्वार गावाचा आधारस्तंभ पीएससी चौक चौरस्ता मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता चौहिकडून गजबजलेले हातठेले, दुकान पानटपऱ्या, राहण्याची घरे यामुळे या चौकाचे श्वास गुदमरून गेले होते यामुळे या चौकाने अपघात, विकासापासून वंचित गलिच्छ घाणेरडे आवार बघितले त्यामुळे नवतरुण ग्रामपंचायत प्रशासनाने या चौकाला मोकळे करून नवसंजीवनी देण्याचे ठरवीत 27 जाने ला कायमचे अतिक्रमण हटवित, अखेर पीएचसी चौकाला मोकळा श्वास दिला.

.     पीएचसी चौकाचे अतिक्रमण हटवून संपुर्ण परिसराची स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून सदर चौकाला छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण देण्यात येणार आहे. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चौकाच्या मधोमध उभारला जाणार असून तसा ठराव सुद्धा ग्रा प ने पारीत केला आहे तसेच याच चौकात संविधान भवन ची सुद्धा नियोजित जागेवर उभारणी होणार आहे तसेच बस स्थानक उभारला जाणार असून त्यासाठी सुद्धा जागा नियोजित केली जाणार आहे आणि संपूर्ण चौकाचे सौन्दयिकरण केले जाणार असून अतिक्रमण हटविलेल्या व्यवसायिकांना ऐका रेषेत व्यवसायासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाईल असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

.     सदर अतिक्रमण हटाव मोहिमे बाबत समाजमाध्यमावर अजूनही काही समाजविघातक या मोहिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहेत अनेकांनी यात सामाजिक आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला प्रशासनाची हुकूमशाही एकाधिकार दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र यात कुठलाही तथ्य नसून सर्व आरोप बिनबुडाचे होते हे नेरी वाशीय गावकऱ्यांनी ग्रा प चे अभिनंदन करून तसेच सदर मोहिमेचा स्वीकार करून केला कारण ग्रा प प्रशासन खंबीरपणे राहून पूर्ण ताकदीने उभी आहे संपूर्ण मोहीम त्यांनी कायद्याच्या चौकडीत राहून केल्याने त्याचा त्यांना अभिमान वाटत आहे कारण याच चौकाच्या विकासाने नेरी शहराला नावरूप प्राप्त होऊन शहराचा विकास साधला जाणार आहे मागील अनेक ग्रा प कमिटया आल्या नी गेल्या मात्र कुणीही या अतिक्रमणला हात लावू शकले नाही पण या नवख्या तरुण तडपदार कमिटींनी इतक्या वर्षात जे काम करू शकल्या नाही तो काम स्वतः पुढाकार घेऊन केल्याने नक्कीच गावाचा विकास साधला जाईल असा विश्वास जनतेला दिला.

error: Content is protected !!