सिंदेवाही : वासेरा – सिंगडझरी येथील गायमुख देवस्थान समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून नव्याने समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये भगवानजी धात्रक यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली. त्याबद्द्ल गावातील सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
. वासेरा – सिंगडझरी येथील गायमुख देवस्थान हे मागील अनेक वर्षांपासून जागृत देवस्थान असून दुर्लक्षित झाले होते. याकडे शासनाचे लक्ष वेधून त्याठिकाणी शासनामार्फत अनेक विकासात्मक कामे करून गायमुख देवस्थानचे सौंदर्यीकरण करण्यात आले. तेव्हापासून एक गायमुख देवस्थान समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीच्या मार्फत मागील अनेक वर्षापासून कारभार सुरू आहे. मावळते अध्यक्ष दिनकर बोरकर यांचा कार्यकाळ संपताच भगवान धात्रक यांची नवीन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच भगवान धात्रक यांनी समितीच्या नावाने असलेल्या शेतीची मोजणी करून तिचे सिमांकन, करणे, गायमुख देवस्थान येथे असलेले भंगार विक्री करणे, देवस्थान येथे नवीन प्रवेशद्वार तयार करणे, यासारखे कामे हाती घेतली असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष भगवान धात्रक यांनी सांगितले आहे.


