Home चंद्रपुर जिल्हा विशेष दुचाकी चोरणारा चोरटा वरोरा पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकी चोरणारा चोरटा वरोरा पोलिसांच्या जाळ्यात

1141

5 लाखाचा मुद्देमाल जप्त

13 दुचाकी हस्तगत

गुन्हे शोध पथकाची कारवाई

वरोरा : वरोरा भद्रावती परिसरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झालेले असताना दुचाकी चोराचा शोध घेत तब्बल 13 दुचाक्या जप्त करण्यात गुन्हे शोध पथक वरोराच्या टीमला यश आले, प्रफुलचंद वामनराव जोगी (45) राह. मार्डी ता. वरोरा जि. चंद्रपुर असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

.      दुचाकी चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत असल्याने नागरिक व पोलीस प्रशासन सुद्धा हैराण झाले होते. या गुन्हाचा छळा लावणे गरजेचे झाले असल्याने पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, सहायक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची चमू दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असताना दुचाकी चोरण्याच्या बेतात असलेल्या चोरट्याला सापळा लावत ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दुचाक्या चोरींची कबुली देत त्याने लपवून ठेवलेल्या 13 दुचाक्या पोलिसांच्या स्वाधीन केल्या. तो दुचाकी वाहने चोरी करुन त्याचे स्पेअर पार्टची अदला बदली करुन विकत होता. त्याचे विरुद्ध पो. स्टे. वरोरा अप क्र. 639/2024 कलम 303(2) भारतीय न्याय सहीता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

.      सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, नयोमी साटम सहायक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाथ पोलीस निरीक्षक अजिंक्य ताबडे पो. स्टे. वरोरा यांचे उपस्थीतीत डि.बी. प्रमुख दिपक ठाकरे, पो. स्टॉप दिलीस सुर, मोहन निषाद, अमोल नवघरे, विशाल राजुरकर, संदिप मुळे, महेश गावतुरे मनोज ठाकरे, संदिप वैद्य पोलीस स्टेशन वरोरा यांनी केली आहे.

जप्ती केलेल्या दुचाकी                                                                                                                                                                        स्लेन्डर प्लस बिना नंम्बरची प्लेट ची रंग काळा चेचीस क्र.MBLHA10EJ8HL20808 इंजीन क्र. HA10EA8HL48076 कि. 30,000/-रु 2) स्लेन्डर प्लस बिना नंम्बरची प्लेट ची रंग काळा चेचीस क्र. 04116041550 इंजीन न. 07K15M03656 कि. 30,000/-रु 3) मोटारसायकलची नंबर प्लेट MH 34 BA1751 कि. 100/- रु 4) मोटार सायकलची नंबर प्लेट MH34-AN 7985 कि. 100/- रु 5) हिरो होन्डा स्लेन्डर कंम्पनीची स्लेन्डर गाडी क्र. MH 34- AH-5535 कि. 40,000/- रु 6) हिरो फँशन प्रो. कंम्पनीची मोटार सायकल खोटी नंम्बर प्लेट MH 34-N-8509 खरी नंम्बर प्लेट क्र. MH 34-Y-0403 कि. 40,000/- रु 7) हिरो स्लेन्डर प्लस खोटी नंम्बर प्लेट असलेली मो. सा.क्र MH34-AD 9575 कि. 40,000/- रु 8) हिरो स्लेन्डर प्लस खोटी नंबर प्लेट क्र. MH 34AB 8575 कि. 40,000/- रु 9) हिरो फैशन खोटी नंबर प्लेट क्र. MH 34M 8451 खरा नंबर क्र. MH 32-M 8451 कि. 40,000/- रु अस एकुन 2,60,200/- रु चा माल जप्त करण्यात आला.                                                                                                      पो. स्टे. वरोरा अप क्र. 410/2024 कलम 379 भादवी या गुन्हात नमुद आरोपीच्या ताब्यातुन 1) हिरो स्लेन्डर मो. सा. खोटी नंम्बर प्लेट क्र. MH34W7400 खरा नंम्बर MH34 AN 7985 कि. 22,000/- रु 2) हिरो स्लेन्डर मो. सा. क्र. खोटी MH31 BG 5953 कि. 25,000/- रु.3) चुकीचा नंबर प्लेट लावलेली हिरो स्लेन्डर मो. सा. क्र.MH 34-AC 2447 कि. 20,000/- रु 4) हिरो होन्डा स्लेन्डर प्लस क्र. MH 34 AC-2609 किमत 25,000/- रु 5) टीव्हीस कंम्पनीची मो. सा. क्र. MH 29 U9304 कि. 25,000/- रु 6) एक फैशन कंम्पनीची मो. सा. क्र. MH 34-W-4024 कि.25,000/- रु असा एकुन 1,42,000/- रु असा एकुण 13 नग मोटारसायकल एकुन कि.5,44,200/-रू.चा मुददेमाल मिळुन आल्याने गुन्हातील आरोपीस रितसर अटक करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

error: Content is protected !!