सिडीसीसी बॅक टेंमुर्डा येथील खातेदार
सिडीसीसी बॅकचे संचालक डॉ. देवतळे यांच्या हस्ते धनादेश वितरित
वरोरा : चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा टेंमुर्डा मार्फत दोन खातेदारांना प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन लाखांचे अर्थसहाय्य मंजूर झाले असून सिडीसीसी बॅकचे संचालक डॉ. देवतळे यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबाना धनादेश वितरित करण्यात आला.
. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टेंमुर्डा येथील खातेदारांनी पंतप्रधान जीवनज्योती विमा आणि सुरक्षा विमा योजनेंतर्गत वार्षिक केवळ ३३० रुपये आणि १२ रुपये भरून विमा उतरवीला होता. या शाखेचे खातेदार शरद वाल्मीक झीले यांचे हदयविकाराने निधन झाले. तसेच रविन्द्र वराटकर यांचे अल्पषा आजाराने निधन झाले होते. दोन्ही खातेदारांनी प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजना काही वर्षांपूर्वी स्वयंचलीत केली होती. या योजने अंतर्गत त्यांचे वारसांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळत असते. खातेदाराचे मृत्यूची बातमी कळताच शाखा व्यवस्थापक कोहीनुर भोयर यांनी घटनेची दखल घेवून योग्य कागदपत्रासह प्रमुख कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार मयत खातेदारांचे वारस कुंदा शरद झिले व चेतना रविंन्द्र वराटकर यांना प्रत्येकी दोन लाखांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले.
. सदर अर्थसहाय्य चंद्रपूर जिल्हा मध्य. सह बँकेचे संचालक तथा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांचे हस्ते वितरित करण्यात आले. त्यावेळी शाखा व्यवस्थापक कोहीनुर भोयर, शाखानिरिक्षक दिपक चिडे,पोर्णीमा वावरे, विजया चौधरी, चेतन चौधरी, अनंता खेवले व इतर खातेदार तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


