आशिष गजभिये
चिमूर : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या चिमूर येथील घोडा रथउत्सव यात्रेला माघ शुद्ध वसंत पंचमीला रविवार (दि. 2) पासून सुरूवात झाली आहे. पूर्व विदर्भ आणि नजीकच्या राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीहरी बालाजी यांच्या घोडा यात्रा महोत्सवात सोमवार (दि.3) पूजा केल्यानंतर मूर्तीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने भाविकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे.
. 10 फेब्रुवारीला शहराच्या प्रमुख मार्गानी या मूर्तीची घोडारथ परिक्रमा निघेल. विदर्भातील सुप्रसिद्ध साडेतीन बालाजीपैकी एक, पेशवे व भोसलेकालीन श्रीहरी बालाजी महाराज मंदिर 399 वर्षे प्राचीन आहे. या मूर्तीविषयी मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. जी. बी. देगलूरकर यांनी या परी हिच मूर्ती एकमेकाद्वितीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. ग्रामउत्सव म्हणून अडीच शतकापासून घोडा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. ही परंपरा कायम ठेवत श्रीहरी बालाजी विश्वस्त मंडळातर्फे 252 व्या रथ यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 फेब्रुवारीरोजी रात्री दहा वाजता कीर्तनाला सुरुवात होऊन, श्रीहरी बालाजीच्या कास्ट मूर्तीची, लाकडी घोडा रथ यात्रेची शहरातून परिक्रमा होईल.


