Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूरात पाच किलो गांजा जप्त

बल्लारपूरात पाच किलो गांजा जप्त

1148

१ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बल्लारपूर : येथील एक गांजा विक्रेता चंद्रपूर येथे गांजा विक्री साठी दुचाकीने जात होता. ही माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या गांजा विक्रेत्याला गजाआड केले. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ८२ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. लालचंद गणेश केसकर रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर असे गांजा विक्रेता आरोपीचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गावर विसापूर हद्दीतील चुनाभट्टी बस स्थानकाजवळ केली.

.      लालचंद केसकर हा अंमली पदार्थाचा विक्रेता आहे. तो बल्लारपूर येथून चंद्रपूर कडे दुचाकी क्रमांक ( एम.एच.34/सी.एल.5025 ) ने गांजा विक्रीसाठी जात होता. त्याच्या दुचाकीच्या डिक्की मध्ये अवैधरित्या गांजा वाहतूक केल्या जात होती. याची माहिती खबरीने पोलिसांना दिली.

.   दरम्यान पोलिसांनी त्याला चुनाभट्टी बस स्थानकाजवळ अडवले. त्याच्या दुचाकीची झडती घेतली.त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीतून ५ किलो ४७८ ग्राम अवैध गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापार परिभाग करणारे पदार्थ अधिनियम आय एन डी पी एस अॅक्ट १९८५ मधील कलम ८(क),२0(४)(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी लालचंद केसकर याला अटक केली.

.      ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मधुकर सामलवार, विनोद बुरले, संतोष निंभोरकर, गजानन डोईफोडे, सुभाष गोहोकर, सतीश अवघ्यारे, दीपक डोंगरे, रजनीकांत पुट्टावार, चेतन गज्जलवार, किशोर वैरागडे, सुरेंद्र मंहतो, प्रशांत नागोसे, प्रफुल्ल गजघाटे, किशोर वाकाटे यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!