Home चंद्रपुर जिल्हा विशेष लाचखोर कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

1104

फवारणी पंप साठी मागितली एक हजाराची लाच

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

त्या कृषी सेवकाच्या मालमत्तेची होणार चौकशी

चंद्रपूर : फवारणी पंपासाठी शेतकऱ्याकडून एक हजाराची लाच स्वीकारताना भद्रावती तालुका कृषी विभागातील कृषी सहाय्यक रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही घटना मंगळवारी दिनांक 4 जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली सरजीव अजाब बोरकर (36) राहणार वरोरा असे लाचखोर कृषी सहाय्यकाचे नाव आहे.

.      राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी मोफत फवारणी पंप वितरित केल्या जात आहे. मात्र हे फवारणी पम्प मिळवण्यासाठी संबंधित साजातील कृषी सहाय्यका कडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. असाच प्रकार भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकऱ्यांशी घडला. भद्रावती तालुक्यातील माजरी येथील एका शेतकऱ्याची नंदोरी येथे शेती आहे. त्यांनी शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करून फवारणी पंपासाठी अर्ज सादर केला त्यानंतर फवारणी पंप मंजूर झाला. मात्र हा मंजूर झालेला पंप मिळविण्यासाठी कृषी सहायकांनी त्या शेतकऱ्याला एक हजार रुपयाची लाच मागितली मात्र त्या शेतकऱ्याला लाच देणे मुळीच पसंत नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार लाच लुचपत विभागाकडून साफळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकला दूरध्वनीद्वारे संपर्क करून पंपासाठी मागणी केली. यानंतर संबंधित कृषी सहाय्यकाने तुमच्या पंप माझ्या घरी आणलेला आहे तुम्ही वरोऱ्याला या तुमच्या पंप तुम्हाला देऊ पण त्यासाठी तुम्हाला मला 1 हजार रुपये द्यावे लागणार. ठरल्याप्रमाणे वरोरा शहरातील रत्नमाला चौका नजीक संबंधित कृषी सहाय्य्कला एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले.

.    ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे व चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, वैभव गाडगे, प्रदीप ताडाम, राकेश जांभूळकर, पुष्पा काचोळे, सतिश शिडाम यांनी ही यशस्वी कारवाई केली.

error: Content is protected !!