Home सामाजिक भद्रावतीत एक दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

भद्रावतीत एक दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

1110

भद्रावती : विवेकानंद स्पोर्टिंग क्लब भद्रावती तर्फे भद्रावती येथे दिनांक २ ला एकदिवसीय 18 वर्षाखालील मुलींची व्हॉलीबॉल स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.

.      या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वान अध्यक्ष विवेकानंद ज्ञानपीठ, वरोरा. तर , प्राचार्य सचिन सरपटवार यांनी सामन्यांचे उद्घाटन केले प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद स्पोटीग क्लब चे अध्यक्ष राजेश मत्ते, बी वाय एस क्लब, अध्यक्ष प्रवीण झाडे, संदीप उईके, चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी, यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली या स्पर्धे करिता चंद्रपूर,वरोरा, वणी, वर्धा व भद्रावतीतील मुलींचे संघ सामील झाले या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये रोख प्रणय रमेश राऊत यांच्याकडून प्राप्त झाले द्वितीय पारितोषिक ५ हजार रु. रोख, स्वर्गीय शोभाताई नामदेवराव मत्ते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, विवेकानंद स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष राजेश नामदेवराव मत्ते यांच्याकडून प्राप्त झाले, तृतीय बक्षीस किशोर दिनकर देठे यांच्याकडून प्राप्त झाले, व माजी आमदार स्वर्गीय निलकंठरावजी शिंदे स्मृती प्रित्यर्थ तीनही विजेते संघास शील्ड, प्राध्यापक विशाल शिंदे, यांच्याकडून प्राप्त झाले दिवसभर चाललेल्या व्हॉलीबॉल सामन्यात रंगतदार खेळाचे मुलींनी प्रदर्शन केले.

.        यामध्ये प्रथम पारितोषिक संस्कार स्पोर्टिंग क्लब वणी, तर द्वितीय पारितोषिक वरोरा स्पोर्ट फाउंडेशन वरोरा आणि तिसरे पारितोषिक न्यूइंग्लिश स्पोर्टिंग क्लब वर्धा यांनी पटकवले या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मागचा उद्देश सतत खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे व भद्रावती सारख्या शहरातून नामवंत खेळाडू निर्माण व्हावे आणि देशपातळीवर भद्रावती शहराचे नाव कोरले जावे अशी ही सुप्त भावना नेहमी विवेकानंद स्पोर्टिंग क्लब ची कार्यरत असते,या स्पर्धेचे दिवसभराचे सूत्रसंचालन विवेकानंद स्पोर्टीग क्लबचे सचिव रविन तेलतुंबडे यांनी केले, ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता क्लबचे दिनेश गोंडे, संतोष दुधे, आकाश क्षिरसागर, आदर्श आसुटकर चेतन भदबुजे, समीर बलकी, व इतर क्लबचे पदाधिकारी, सदस्य व सर्व खेळाडू यांनी मदत केली.

error: Content is protected !!