Home चंद्रपुर जिल्हा विशेष स्कूल बसला धडक देत कारने दुचाकीस्वारास चिरडले

स्कूल बसला धडक देत कारने दुचाकीस्वारास चिरडले

1115

चंद्रपूर : विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या कारने उभ्या असलेल्या स्कुल बस ला धडक दिली. दरम्यान कार अनियंत्रित झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना 2 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील बायपास मार्गावर घडली, अपघातानंतर कार चालक घटनस्थळावरून पसार झाला.

.    प्राप्त माहितीनुसार दुचाकी वाहन क्रमांक MH 34 G 6197 हे चंद्रपूर वरून बल्लारपूर च्या दिशेने जात होते. त्यावेळी जुनोना मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने भरधाव कार येत होती कार चालकाने वाहन विरुद्ध दिशेने टाकले, अतिवेगात असलेल्या कारने उभ्या असलेल्या स्कुल बस ला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित कार दुचाकी ला धडकली, धडक इतकी जबर होती की दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला पडला, या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. दुचाकीला धडक देऊन कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!