विद्युत वितरण कंपनीमुळे शेतकरी हतबल
आनंद मेश्राम
नागभीड : तालुक्यातील पारडी गायमुख येथील शेतकऱ्यांना दोन वर्षापासून धानाच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे . कर्ज काढून शेतात बोअरवेल मारले. आणि धान पिक घेऊ लागले. पण अचानक ट्रान्सफॉर्मर जळाले. शेतकऱ्यांनी विद्युत विभागाकडे तक्रार केली मात्र शेतकऱ्याचा तक्रार अर्ज धुळखात पडला आहे. परिणामी शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
. पारडी गायमुख, बोंड येथील बहुतेक शेतकरी धान पिक घेतात. शेत जमीन ओळीताखाली आल्याने दुबार पीक घेऊ लागले आपला उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण पद्धतशीर करू लागले होते. परंतु विद्युत वितरण कंपनी च्या कामचुकारपनामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. त्या भागातील एकूण २४ शेतकऱ्यांचे शेतातील वीज कनेक्शन एकच ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे ओव्हर लोड येऊन मोटारी जळतात किंवा बंद पडतात त्यामूळे उन्हाळी पिकाला पाणी पुरवठा होत नाही. अगोदर एका ट्रान्सफॉर्मर वर ९आणि दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर वर १५ कनेक्सन होते, पण दुसरा ट्रान्सफॉर्मर आणून देतो म्हणून नेले आणि शेतकऱ्यांच्या हातात तुरी देऊन सर्व शेतकऱ्यांना एकच ट्रान्सफॉर्मर वर सर्व कनेक्शन देऊन शेतकऱ्यांच्या आयुष्यसोबत विद्युत विभागाने खेळ मांडला आहे. शेतकऱ्यांनी ब्रह्मपुरी तसेच तलोधी येथील विद्युत कार्यालयाचे चकरा मारल्या पण कुणी ऐकण्यास तयार झाले नाही. शेतकऱ्यांच्या नेलेला ट्रान्सफॉर्मर पूर्ववत चालू करून द्यावा अन्यथा आम्ही सर्व शेत्री आंदोलन करणार असे नवजीवनच्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधि सोबत बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत आमदार याना सुध्दा निवेदन देण्यात आले आहे.
दोन वर्षापासून आम्ही शेतकरी विद्युत विभागाच्या चकरा मारतो पण आमचे कुणीच ऐकत नाही. आम्हावर आत्महत्या करण्याची पाळी आता आलेली आहे. कारण खर्च लाऊन आमची रोवणी झाली पण पिकाला पाणी पुरवठा होत नाही त्यामूळे धान मरू लागले आहे. मंगेश घ्यार, शेतकरी, पारडी गायमुख


