Home चंद्रपुर जिल्हा विशेष ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

1088

खडसंगी जवळील घटना

चिमूर : ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तनिस घेऊन चिमूर वरून वरोरा येथे जात असलेले ट्रॅक्टर दुभाजकावर चढत वीज खांबाला धडकला यात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील खडसंगी गावाजवळ ताडोबा वळणावर 28 जानेवारीला रात्री 11:30 वाजताच्या सुमारास घडली. मयूर प्रभाकर सुकारे (२२) राहणार मोटेगाव असे मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

.   सविस्तर वृत्त असे आहे की, चिमूर येथून दिनांक २८ जानेवारी २०२५ ला रात्रौ ११ ते १२ वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ सिडी ९५६६ या ट्रक्टरने तनीस भरून वरोरा कडे भरधाव वेगाने जात होता. चिमूर कडून वरोराकडे भरधाव वेगात जात असताना खडसंगी गावाजवळील ताडोबा वळणावर चालकाचे वाहणावरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर सरळ दुभाजकावर चढला आणि विज खांबाला धडकला.यात ट्रॅक्टर चालक मयूर सुकारे यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेचा तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक नवखरे आपल्या पोलीस पथकासह करीत आहेत.

दोन महिन्यात दुसरा बळी                                                                                                                                                             अवैध रेती वाहतूक करीत असताना शिवणपायली येथील वळणावर याच ट्रॅक्टरमध्ये दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जप्त केला होता. मात्र काही दिवसानंतर सुपुर्दनाम्यावर ट्रॅक्टर सोडून देत प्रकरण चौकशी करीता ठेवले होते. मंगळवारी याच ट्रॅक्टरने दुसरा अपघात होऊन ट्रॅक्टर चालकाचाच मृत्यु झाल्याची घटना घडली. ट्रॅक्टरने दुसरा जीव घेतला अशी चर्चा सूरू आहे.

error: Content is protected !!