Home सामाजिक भद्रावती येथे खैरे कुणबी समाजाचा तालुकास्तरीय स्नेह मिलन सोहळा

भद्रावती येथे खैरे कुणबी समाजाचा तालुकास्तरीय स्नेह मिलन सोहळा

1118

आमदार करण देवतळे तथा राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कारप्राप्त अतुल कोल्हे सन्मानित

भद्रावती : खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ भद्रावती यांच्यावतीने स्थानिक मुर्लीधर गुंडावार सभागृहात खैरे समाजाचा तालुकास्तरीय कौटुंबिक स्नेहमिलन तथा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

.      या सोहळ्यात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार करण देवतळे तसेच भद्रावती येथील प्रसिद्ध पत्रकार, राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कार विजेते पत्रकार अतुल कोल्हे यांचेसह समाजातील अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य विठ्ठल मांडवकर होते.

.      प्रमुख अतिथी म्हणून मारोती सहस्त्रबुद्धे, डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे, बंडू मांडवकर, साईनाथ वाकुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक डॉ. नरेंद्र आरेकर व प्रलय मशाखेत्री यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित आमदार करण देवतळे, पत्रकार अतुल कोल्हे, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, रवींद्र चौधरी, दिनेश पाल आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यात महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती बोरकुटे व राणी पाल यांनी केले. यावेळी समाजाचे अध्यक्ष हनुमान घोटेकर, सचिव आत्माराम देशमुख, कोषाध्यक्ष अश्विन हुलके, उपाध्यक्ष प्रशांत राऊत, सहसचिव निलेश बोरकुटे, कार्याध्यक्ष दशरथ सातपुते यांची विशेष उपस्थिती होती.

.       कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजू तांगडे, योगेश शिवणकर, महेश वाघरे, ऋषिकेश कुडे, अमोल पांडे, विनोद पिपरे, बालाजी लडके, विलास घोटेकर, शंकर घोटेकर, राहुल चनकापुरे, लंकेश देशमुख, योगेश घोटेकर, नितीन नकाते, पांडुरंग भोयर, देवानंद ठाकरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!