चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील भटाळा या गावाला अनेक पुरातत्व वैभव लाभले आहे. येथे हेमालपंथी शिवमंदिर आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भटाळा येथील शिवमंदिर आता धोक्यात आले आहे. भटाळा गावालगत असलेल्या पांढरा दगड खाणीत दिवसाढवळ्या ब्लास्टिंग करून दगड फोडल्या जात आहे.
. खरं तर वडार समाज यांना उपजीविकेचे साधन म्हणून महसूल प्रशासन यांच्याकडून लिजवर पांढरा दगड खदान दिली जाते, मात्र वडार समाज हात मेहनतीने दगड न फोडता दिवसाढवळ्या ब्लास्टिंग करून दगड फोडल्या जात आहे. या ब्लास्टिंग चे धक्के भटाळा ग्रामस्थ अनुभवत असतानाही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, महसूल व पुरातत्व विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे भटाळा येथील पुरातन मंदिरांना भेगा जाण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे शिव मंदिरालाच धोका पोहोचणार आहे. याकडे पुरातत्व विभाग काय भूमिका बजावतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


