चंद्रपूर : क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर प्रभागात अंपग नागरिकांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात विकलांग नागरिकांसाठी तीन चाकी सायकल व वाकर वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
. यावेळी या कार्यक्रमास उद्घाटक श्याम पडगेलवार, समाजसेवक राहुल देवतळे, अध्यक्षस्थानी अजय कोतपल्लीवार तर प्रमुख अतिथी म्हणून बिंदू बड़केलवार, धनंजय येरेवार, अरूण गर्गेलवार, सुरेश थोरात, आनंद चौधरी, अनिल बोरेकर, प्रितम मामीडवार, किशोर सातपूते, दादू जिझिलवार, अजय निंबाळकर, अभय राऊत, सौरभ मामीडवार, वसंता पवार व स्पर्धेचे निरिक्षक म्हणून संजय वायकोर व कार्यक्रमाचे संचालन अशोक पडगलवार यांनी केले.
. सदर कार्यक्रमात चित्रकला स्पर्धेत प्रथम पुरस्कार विद्यार्थिनी प्रिया चंदू राऊत, व्दितीय पुरस्कार अक्षरा राहूल देवतळे तर तृतीय पुरस्कार प्रजल प्रकाश खडके यांनी प्राप्त केला आहे. कार्यक्रमाला विठठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.


