Home चंद्रपुर जिल्हा विशेष लोणार (धोटे) येथे जल जीवन मिशन बांधकामात गैरप्रकार 

लोणार (धोटे) येथे जल जीवन मिशन बांधकामात गैरप्रकार

1177

गावकर्‍यांचा आरोप

वरोरा : जलजीवन मिशनअंतर्गत वरोरा तालुक्यातील लोणार (धोटे) येथे 1 कोटी 23 लाख 6 हजार 857 रुपयाचा निधी मंजूर झाला. त्याचे कामही सुरू आहे. मात्र जल जीवन विहीरीचे व स्विच रूमच्या बांधकामात मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असतांनाही संबंधीत अधिकारी व ग्राम पंचायत प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

.      जल जीवन मिशन हर घर जल योजनेअंतर्गत गट ग्रामपंचायत सुमठाना अंतर्गत येत असलेल्या लोणार (धोटे) येथील नागरिकांना पाण्याची सोय सुविधा व्हावी या उदात्त हेतूने केंद्र व राज्य शासनाकडून 1 कोटी 23 लाख 6 हजार 857 रुपयाचा निधी मंजूर झाला. या योजनेचे कंत्राट के. एम. देव या कंत्राटदाराला देण्यात आले असून या योजनेअंतर्गत बोरवेल, पुरवठा विहीर, रिचार्ज शॉफ्ट व स्ट्रेंच गॉलरी, ऊर्ध्व नलिका, स्विच रूम सह आदी कामांतील घटकांचा समावेश आहे. यातील पुरवठा विहीर व स्विच रूमचे काम बोगस होत असल्याचे गावकर्‍यांच्या निर्देशनात आले. याबाबत गावकर्‍यांनी सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांच्याकडे होत असलेल्या गैरप्रकाराची तक्रार दिली. मात्र याकडे ग्राम पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष करीत उदासीनता दर्शविली. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

.       संबंधित कामाचा कालावधी 16 महिन्याचा असल्याने कंत्राटदार थातुरमातुर कामे करून शासनाच्या करोडो रूपयाच्या योजनेला पाणी पुसणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करणार असल्याचे विविध कार्यकारी चे अध्यक्ष सचिन दडमल, उमेश टोंगे सह गावकरी करणार आहे.

error: Content is protected !!