Home सामाजिक सर्वोदय कन्या विद्यालयात आनंद मेळावा

सर्वोदय कन्या विद्यालयात आनंद मेळावा

1191

सिंदेवाही : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय, सिंदेवाही येथे स्काऊट गाईड विभागातर्फे विद्यार्थ्यांना रोजगाराचे महत्त्व पटावे यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

.     या मेळाव्याचे उद्घाटन विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र जयस्वाल यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सचिव अरविंद जयस्वाल, सर्वोदय कन्या विद्यालयाच्या प्राचार्या संगिता यादव, प्राचार्य अतुल केकरे, पर्यवेक्षक विलास धुळेवार, पर्यवेक्षक सुनील सुकारे उपस्थित होते. शाळेच्या परिसरात विविध पदार्थांचे एकूण २६ स्टॉल लागलेले होते. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी पदार्थ घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती.

.     या आनंद मेळाव्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलचे परीक्षण करण्यात येतात. आनंद मेळाव्याचे परीक्षण भारती जयस्वाल, जयश्री यादव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कावळे, मंजुषा कुर्रेवार, मनोहर आत्राम,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारि यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!