शेतातील कुंपणाला सोडला होता विद्युत प्रवाह
चार दिवसानंतर आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
आरोपी शेतकऱ्याला अटक
सालोरी शेतशिवारातील घटना
वरोरा : जंगली जनावरांपासून शेत पिकांची सुरक्षा करण्यासाठी शेतीला कुंपण करण्यात आले. या कुंपणालगत असलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडल्याने शेतमजुराचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 1 जानेवारी ला उघडकीस आली. संजय मारुती शिरपूरकर (32) रा. सालोरी असे मृतक शेतमजुराचे नाव आहे.
. पोलीस सूत्रानुसार वरोरा तालुक्यातील सालोरी येथील शेतकरी मारोती नागोसे यांची सालोरी साजात शेतजमीन आहे. सालोरी गाव जंगलाला लागून असल्याने या परिसरात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात हौदोस आहे. जंगली जनावरे शेत पिकाची नासाडी करत असल्याने शेत पिकाच्या सुरक्षितेसाठी नागोसे यांनी शेताच्या भोवताल तारेचे कुंपण केले व त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. मृतक संजय शिरपूरकर हा शेतकरी अरुण शेरकुरे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करीत होता. तो दिनांक 29 /12/ 2024 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान मालकाच्या शेतात गेला असता तो घरी परत आला नाही त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने त्याचे संबंधात मृतकाच्या नातेवाईकांनी दिनांक 1/1/25 रोजी पोलीस स्टेशन शेगाव येथे मिसिंगबाबत माहिती दिली. तक्रार दाखल होतात शेगाव पोलिसांनी संजयची शोध मोहीम सुरू केली दरम्यान संजयचा मृतदेह मारोती नागोसे राहणार सालोरी यांच्या शेतात इलेक्ट्रिक करंट लावून असलेल्या तारा जवळ मृत अवस्थेत मिळुन आला आरोपी यांनी त्याचे शेतातील पिकाच्या संरक्षणाकरिता शेतात असलेल्या मीटर मधून ताराने इलेक्ट्रिक करंट घेऊन शेताच्या भोवताल लावलेल्या ताराला करंट लावून ठेवला होता मृतक हा त्या ताराला चिटकून मरण पावला प्राप्त तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
. मृतक संजय हा तीन ते चार दिवस घटना स्थळी मरण पावल्याने त्यांचा शरीरावर किडे पडले होते. त्यामुळे घटना स्थळी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील वैधकीय अधिकारी यांना पाचारण करून शवविच्छेदन करण्यात आले. असून पार्थिव शरीर नातेवाईक यांना सोपविण्यात आले, मृतक संजय शिरपूरकर याच्या मागे पत्नी, 4 वर्षाचा मुलगा, आई, वडील, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे पोस्ट शेगाव हे करीत आहे.


