सिंदेवाही : ऐतिहासिक ५०० महार शूरवीरांच्या विजयी स्तंभाला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा सिंदेवाहिच्या वतीने मौजा लोनखैरी येथे समता सैनिक दलाच्या पथसंचालनात आणि असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.
. १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या इंग्रज – मराठे युद्धाच्या मालिकेने पेशवाई संपली. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणात होत होते. व महारांना अत्यंत हिन वागणूक दिली जात होती. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्या मध्ये लढले. आणि विजयी झाले. भीमा कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठावर ७५ फूट उंच विजयी स्तंभ उभारून त्यावर महार सैनिकांचे नावे कोरले आहेत. या शौर्य दिनाचे औचित्य साधत भारतीय बौध्द महासभा तालुका सिंदेवाही च्या वतीने मौजा लोनखैरी येथे समता सैनिक दल, यांच्या पथसंचालनात विजयी स्तंभाला मानवंदना देण्यात आली. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रत्तीमांना पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले. मानवन्दना म्हणून त्रिशरण पंचशील. भीमस्तुती भीमस्मरण घेण्यात आली.
. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अंबादास कोसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे भाषण करतानां डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्ही शूरवीरांची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयी स्तंभावर कोरलेली आहेत. तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. यांची आठवण आपल्या भाषणातून करून दिली.
. यावेळी तालुका सरचिटणीस जगदीश सेमस्कार, मन्साराम सहारे, करुणा सहारे, केवळ सहारे, दुलनदर शेषराव अंबादे, पुरुषोत्तम अंबादे, अश्विन राऊत, सुखदेव राऊत, राजेंद्र शिंपी, राजेंद्र भैसारे, वालदे यांचेसह असंख्य समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.


