कुचना : विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
. पहिल्या दिवशी घटस्थापना व कार्यकर्ता व महिला मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून सरपंच सुचिता ताजने व उद्घाटक म्हणून विद्याताई जुनघरी होत्या तर प्रमुख पाहुणे राजू भोंगळे गुरुदेव प्रचारक रामकृष्ण ताजणे, आशा ताजणे माजी पंचायत समिती सभापती योगिता बंड पोलीस पाटील कानोबा तिकट संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती पाहुणे म्हणून उपस्थित होते.
. दुसऱ्या दिवशी गावातून राम धुन दिंडी भजनाच्या कीर्तनाच्या वातावरणात काढण्यात आली. यात सर्व गाव सहभागी झाले. यावेळी गावकऱ्यांनी गाव अगदी स्वच्छ करून व घरासमोर रांगोळ्या टाकून गाव सजविण्यात आले. राम-धून, प्रार्थनेचे महत्व व आजचा युवक व युवकांमध्ये व्यसनाधीनता यावर मार्गदर्शन राजू घुमणार ग्रामगीता प्रचारक यांनी केले.
आमदार करण देवतळे यांची उपस्थिती असून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धकांना बक्षी वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल ताजणे यांनी केले. तर कल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण डाखरे महाराज यांनी केले.
. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता मंडळाचे अध्यक्ष संदीप मेश्राम, संदीप तिखट, बबनराव बदकी, राजेश तिखट, गणपतराव महातळे, संतोष काळे, हरबा ताजणे, मंगेश महातळे, बंडू महातळे, कवडू वरखडे, भाऊराव महातळे व समस्त कुचना गावकरी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.


