10 ते 15 बकऱ्या गंभीर
प्रशासनाने गरीब बकरी मालकाला नुकसान भरपाई द्यावी गावकऱ्यांची मागणी
शिवनपायली येथील घटना
एक महिला दोन पुरुषांवर मधमाश्या नी केला हल्ला
नेरी : चिमुर तालुक्यातील शिवनपायली येथे दि. 1 जानेवारी ला सकाळी अकरा वाजता दरम्यान रस्त्यावरून उडत असलेल्या मधमाश्याच्या समूहाने अचानक रस्त्यावरील घरासमोर बांधलेल्या बकऱ्यावर हल्ला चढविला. यात तीन बकऱ्या दुपारी चार वाजता ठार झाल्या तर दहा ते पंधरा बकऱ्या गंभीर आहेत याच वेळेस एका महिलेवर आणि दोन पुरुषांवर रस्त्याने जात असताना हमला केला तेव्हा सदर जीव वाचविण्यासाठी त्यांनी घरात शिरून मधमाश्यापासून आपला बचाव केला मात्र ते सुद्धा माशांच्या हल्ल्यात जखमी झाले.
. सविस्तर वृत्त असेंकी शिवनपायली येथील विनायक रामचंद्र नागोसे याचे घर रस्त्यावर आहे घरासमोर नेहमी प्रमाणे बकऱ्या बांधल्या होत्या सकाळी अकरा वाजता दरम्यान मधमाश्याचा समूह रस्त्यावरून जात असताना अचानक मधमाश्यांनी आपला मोर्चा घरासमोर बांधलेल्या बकऱ्याकडे वळवीत हल्ला चढविला यावेळी बकरी मालक विनायक नागोसे घरी हजर होते अचानक हल्ल्याने बकऱ्या ओरडायला लागल्याने काय झाले हे बघण्यासाठी बाहेर आले असता त्यांना मधमाश्या चा रुद्र अवतार दिसला तात्काळ बांधलेल्या बकऱ्या सोडण्याचा प्रयत्न केला असता मधमाशांनी त्यांच्यावर सुद्धा हल्ला चढविला यामुळे बकऱ्यांना तसेच ठेवून आपला जीव वाचविण्यासाठी त्यांनी बाहेर पळ काढला आणि समोरच्या घरी आसरा घेतला त्यानंतर एक महिला एक पुरुष रस्त्याने येत असताना त्याच्यावर सुद्धा हल्ला झाला तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्यांनीसुद्धा बाजूच्या घरी जाऊन सुटका केली सर्व दरवाजे बंद केले आणि मधमाश्या जात नाही तोपर्यंत घरात आश्रय घेतला सदर बकऱ्या मालक हा गरीब असून बकरी पालन करून आपली व कुटूंबाची उपजीविका चालवितो मात्र या हल्ल्यात तीन बकऱ्या ठार झाल्याने तसेच दहा ते पंधरा बकऱ्या गंभीर असल्याने त्याच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे तेव्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन बकरी मालक नागोसे याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


