Home चंद्रपुर जिल्हा विशेष महसूल विभागाला पोलीस विभागाने दिले रेती मोजमाफीचे पत्र

महसूल विभागाला पोलीस विभागाने दिले रेती मोजमाफीचे पत्र

1195

महसूल विभागाने ट्रॅक्टर जप्त करून महसुलाची दंडात्मक कारवाई करावी – नागरिकांची मागणी

शिवनपायली ! रेती तस्करी मृत्यू प्रकरण

नेरी : रेतीची अवैध वाहतुक करताना ट्रॅक्टरखाली दबून शिवणपायली येथील लखन पॉईंनकर १९ या तरुणाचा मृत्यू झाला होता.नेरी चौकीचे पोलीस अधिकारी यांचे कडे चौकशी असताना त्यांनी संथगतीने चौकशी केल्याने कुटुंबिय.आणि एकलव्य संघटनेने संताप वेक्त केल्याने प्रकरणाची चौकशी उपपोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोठे यांचे कडे देण्यात आले होते त्यांनी चौकशी करून ट्रॅक्टर मालकावर मोटार कायद्याने गुन्हे दाखल करून महसूल विभागला रेती मोजमाफ व दंडत्मक कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

महसूल विभाग गाफिल का ? : जिल्हात अवैध रेती तस्करीत दबून मृत्यू प्रकारणांने खळबळ माजली आहे. मात्र तालुक्यातील महसूल विभागाला याची तिळमात्र कल्पना नसने हे मात्र संशयस्पद वाटते असून महसूल विभाग डोळ्यावर पट्टी बांधून मूग गिळून गप्प असल्याने महसूल विभाग गाफिल राहण्याचे कारण का ? रेती तस्करीसाठी महसूल विभाग मेहरबान आहे.का ? असेही नागरिकांत चर्चेला जातं आहे.

.       घटनास्थळावर अवैध रेती तस्करी चा ढीग असताना तेव्हा महसूल विभागाला चौकशी किवा दडात्मक कारवाही करण्याचे पत्र देणे गरजेचे असताना त्या ठिकाणातून रेती तस्करानी रेती नेल्यानंतर पोलीस विभागला उशिरा जाग आली.आणि महसूल विभागाला आता पत्र व्यवहार केला जातं असल्याने आरोपीला घटनास्थळा वरील पूरवा नष्ठ करण्यास वेळ मिळाला आहे. तब्बल तेरा दिवसानंतर चिमूर पोलीस विभागानी महसूल विभागाला रेती मोजमाफी व दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र दिले असल्याने पोलीस विभागाच्या पत्रावर महसूल विभाग कोणती कारवाही करते. त्या कडे शिवणपायली येथील जनतेचे लक्ष लागले आहे. पूरावा नष्ठ करणे आणि बालकामगार राबविणे हे गुन्हे ट्रॅक्टर मालवकावर दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे मृत्यूकाच्या कुटुंबानी आरोप केला होता त्यावर पोलिस तपासावर पुन्हा एखदा प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

सदर रेती प्रकरणा बाबत मंडळ अधिकारी यांना चौकशी करण्यास आदेश देण्यात येईल.                                                                                                                                                                                             श्रीधर राजमाने,                                                                   तहसीलदार चिमूर

error: Content is protected !!