Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपुरात प्लास्टिक साठ्यावर मनपाचा सर्जिकल स्ट्राईक

चंद्रपुरात प्लास्टिक साठ्यावर मनपाचा सर्जिकल स्ट्राईक

221

७० किलो माल जप्त !

कोमल ट्रेडर्सवर ५ हजारांचा दंड

माहिती देणाऱ्याला मिळणार ५ हजारांचे बक्षीस

चंद्रपूर : शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. मनपाच्या उपद्रव शोध (NDS) पथकाने आज गोल बाजार परिसरात मोठी कारवाई करत ‘कोमल ट्रेडर्स’ या दुकानातून अंदाजे ७० किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

.      मनपाच्या पथकाने गोल बाजार परिसरातील दुकानांची आकस्मिक तपासणी केली असता, कोमल ट्रेडर्समध्ये ३ पोत्यांमध्ये भरलेले एकदाच वापरता येणारे प्लास्टिक आढळून आले. शासनाने बंदी घातलेला हा साठा जप्त करून संबंधित दुकानदाराकडून जागेवरच ५,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

.      आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरात सध्या ८ विशेष पथके सक्रिय आहेत. ही पथके दररोज विविध भागांत तपासणी करत आहेत. विशेष म्हणजे, बंदी असलेल्या प्लास्टिकची माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार आहे. तसेच, दिलेली माहिती खरी ठरल्यास संबंधित व्यक्तीला ५,००० रुपयांचे रोख बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे.

.      चंद्रपूर शहर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!